Top News

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविणारे केंद्र ठरावे:- आ. किशोर जोरगेवार

ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीची शेतकऱ्याना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी नियोजन करावे. आ. किशोर जोरगेवार.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात  ग्रामीण भाग मोठा असून  शेतीवर उपजीविका  असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती नेहमीची शेतकऱ्याना आर्थिक रित्या सक्षम करण्यासाठी नियोजन करावे. शेतकरी हिताचे निर्णय घेत हि कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याना स्वयंपूर्ण बनविणारे केंद्र ठरावी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला. यावेळी सभापती दिनेश चोखारे, उपसभापती रंजीत डवरे, संचालक निरज बोंडे, गोविंद पोळे, अरविंद चवरे, प्रभाकर श्रीरामे आदींची उपस्थिती  होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने