Top News

वायगाव येथे नवीन रास्त भाव दुकान सुरू.

3 किलोमीटर अंतरावरील नागरिकांची पायपीट थांबणार.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे जिल्हा पुरवठा, तालुका पुरवठा कार्यालयाच्या पुढाकाराने नवीन रास्त भाव दुकानाला मंजुरी देऊन सुरु करण्यात आले आहे. वायगाव हे ताडोबा बफर क्षेत्रात येत असून घनदाट जंगलांने वेढलेले आहे. तीन किलोमीटर अंतरावरील निंबाळा या गावातून नागरिकांना धान्य घ्यावे लागत होते. नवीन रास्त भाव दुकान सुरू झाल्याने अन्नधान्य घेण्यासाठी नागरिकांची पायपीट आता थांबली आहे.

नवीन रास्त भाव दुकानाचा शुभारंभ दिनांक 12 जुलै रोजी सरपंच उमाकांत सुर्तीकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी भारत तुंबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव श्री.तुरे, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते.

नवीन रास्त भाव दुकान सुरू झाल्याने धान्य घेण्यासाठी सुलभ झाले असून इतर ठिकाणी धान्य घेण्यासाठी जाणारा वेळ वाचणार आहे, असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने