उद्या पासून 9 ते 5 सुरु राहणार सर्व आस्थापने, व्यावसायीकांनी मानले आ. जोरगेवार यांचे आभार.
Bhairav Diwase. July 24, 2020
चंद्रपूर:- शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता 17 जुलै पासून लाॅकडाऊन करण्यात आले होते. मात्र या लाॅकडाऊनमूळे व्यावसायीकांसह नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. हि बाब लक्षात घेता लाॅकडाऊन उठविण्यात यावे अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कूणाल खेमणार यांना केल्या होत्या. त्यानंतर 26 जुलै पर्यत्न राहणार असलेले लाॅकडाऊन दोन दिवसापर्वीच हटविण्यात आले आहे. त्यामूळे उदया शणिवार पासून शहरातील सर्व आस्थापणे सकाळी 9 ते सांयकाळी 5 पर्यंत सुरु राहतील. नियोजीत वेळेच्या दोन दिवसांपूर्वीच लाॅकडाऊन उठविण्यात आल्याने व्यावसायीकांनीही आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार माणले आहे.