मुल तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक.
Bhairav Diwase. July 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल तालुक्यातील नांदगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा बँक कर्मचाऱ्यांना मुल संस्थात्मक अलगीकरण करण्यात पाठवण्यात आले असून बँकेचे सर्व व्यवहार ठप्प करून सील करण्यात आले आहे सदर शाखा व्यवस्थापक चंद्रपूरहून ये-जा करतात त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती हे बाहेर जिल्ह्यातून आल्याने त्यांना चंद्रपूर येथे अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते त्यांनी यांच्या संपर्कात आल्याने शाखा व्यवस्थापक हे पॉझिटिव आढळून आले त्यामुळे नांदगावात भितीचे वातावरण पसरले आहे कारण आतापर्यंत बँकेत शेकडो नागरिक हजेरी लावली आहे सध्या पीक कर्ज वाटप चालू होते त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेण्यासाठी व इतरही व्यवहार करण्यासाठी बँकेत वारंवार जात होते त्यामुळे गावात भितीचे वातावरण पसरले असून बाजारपेठ ऊद्या बंद ठेवण्यात आली आहे.