काडकूड नगर वडाळा पैकू चिमूर येथे घरात घुसले पाणी.

Bhairav Diwase
नगरसेविका सौ. छायाताई कंचर्लावार यांनी घेतली धाव.
Bhairav Diwase.    July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- आज झालेल्या जोरदार पाऊसाने  काडकूड नगर वडाळा पैकू मधील लोकांच्या घरात पाणी घुसले ही माहिती मिळताच या प्रभागाच्या नगरसेविका तथा गटनेत्या सौ छायाताई कंचर्लावार यांनी भर पावसात धाव घेऊन पाहणी केली.
           सौ छायाताई कंचर्लावार यांनी तात्काळ भ्रमणध्वनी वरून अभियंता रणदिवे, व राहुलवार उईके यांना बोलावून घटनास्थळा ची पाहणी करीत अवस्था दाखविली आणि आज तात्पुरती शहीद बालाजी रायपूरकर सभागृहात गरजू लोकाना राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून उद्या तात्काळ पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करून देण्याचे सांगण्यात आले.