Top News

आम आदमी पार्टी वाढीवबिलाचा हिशोब मागणार.

आम आदमी पार्टीच्यावतीने वीज दरवाढीच्या विरोधात राज्यभरात 'हिसाब दो' मोहीम हाती.

Bhairav Diwase.    July 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपुर:-
आम आदमी पार्टीच्यावतीने वीज दरवाढीच्या विरोधात राज्यभरात 'हिसाब दो' मोहीम हाती घेतली आहे.
दुसरीकडे अव्वाच्या सव्वा आलेले वीजबिल आणि विजेच्या वाढीव दरवाढीविरोधात आप ने टप्प्याटप्प्याने  अनेक आंदोलन केले यापुढे आंदोलन तिव्र करन्याचा  इशारा देण्यात आला आहे.

लॉकडाऊनमुळे होरपळलेल्या सामान्य नागरिकांना आता वीज दरवाढीचा शॉक राज्य सरकारने दिलेला आहे. याविरोधात मोहीम तीव्र करत नागरिकांना या दरवाढीविरोधात संघटित करून राज्य सरकार तसेच वीज नियामक मंडळापर्यंत त्यांच्या तक्रारी पोहोचवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.  hisaabdo.in  या  वेबसाइटच्या माध्यमातून वीज नियामक मंडळाला वाढीव वीजबिलांबाबत आता नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. या माध्यमातून नागरिकांना दिल्ली व महाराष्ट्राच्या वीज बिल मधील तफावत समजून येणार आहे. या मोहिमेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

लॉकडाऊन काळातील ४ महिन्यांचे प्रति महिना २०० युनिट वीजबिल माफ करावे यासाठी राज्य सरकारला निवेदन देण्यात आले आहे. या अन्यायकारक दरवाढीविरोधात अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. जोपर्यंत ही वीज दरवाढ मागे घेतली जात नाही, २०० युनिट बिल माफ केले जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
असे मा.मुख्यमंत्री याना जिल्हाधिकारी चंद्रपुर  मार्फत पाठविलेल्या पञात आप चे जिल्हाध्यक्ष श्री.  सुनिल मुसळे तसेच नवनियुक्त महानगर चे अध्यक्ष श्री.राजेश विराणी यानी केले आहे याप्रसंगी कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी .सोशल मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार महानगर , उपाध्यक्ष श्री योगेश आपटे ,सचिव श्री. राजु कुडे माजी जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार तसेच आप चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने