Top News

महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी एक खिडकी योजना.

चंद्रपूर येथील नवउद्योजकांनी घ्यावा लाभ.

Bhairav Diwase.    July 18, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायाला चालना मिळावी. व्यवसाय उभारतांना येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उद्योग संचालनालयामार्फत एकल खिडकी योजना राबवलेली आहे.उद्योग संचालनालयाने महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल (मैत्री) तयार केलेले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून उद्योगासंदर्भात वेगवेगळ्या विभागाचे विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील उद्योजकांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड यांनी केले आहे.

या पोर्टल मार्फत ज्या नवीन व सध्या सुरू असलेल्या उद्योगांना वेगवेगळ्या विभागाच्या विविध परवाने एकाच ठिकाणी उपलब्ध केल्या जातात.जवळजवळ 12  विभागातील 48  ऑनलाईन मंजुरी आणि परवाने या पोर्टलवर मिळवू शकतात.

या विभागातील मिळणार परवानगी:

उद्योग, कामगार, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वस्तू व सेवा कर नोंदणी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगरविकास, विधी व न्याय, स्टीम बॉयलर्स संचालनालय, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय या विभागातील 48 मंजुरी आणि परवानगी उद्योजकांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी www.di.maharashtra.gov.in तसेच maitri.mahaonline.gov.in वर लॉग ऑन करा किंवा 022-22622322022-22622362 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करू शकता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने