आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक नवेगाव येथे आज सकाळी सहाच्या सुमारास एका वृद्धाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकाचे नाव परशुराम गोविंदा नैताम (वय ६५) असे आहे. पोंभूर्णा पोलीस ठाण्यात मार्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नाईकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धिरज मसराम, पो. हवा. सुरेश बोरकुटे, ना. पो. शी. सुरेश मडावी हे करित आहेत. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.