चिंतामणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून प्रणाली घनशाम टिकले हीने प्रथम क्रमांक.
Bhairav Diwase. July 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभूर्णा:- नुकताच इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाला. पोंभूर्णा येथील चिंतामणी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून प्रणाली घनशाम टिकले हीने प्रथम क्रमांक पटकाविला. राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका पोंभूर्णा तर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हा सचिव रुषी हेपटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जवाहर धोडरे, पोंभूर्णा शहर राष्ट्रवादी युवक कांग्रेस अध्यक्ष गुरुदेव मडावी, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्षा विभाताई विराज मुरकूटे, कार्याध्यक्ष हिराजी पावडे, तालुका सचिव सुधाकर आलाम आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी सुयश प्राप्त विध्यार्थीनीचे अभिनंदन करित भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.