माना आदीम जमात मुंबईची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ ला भरीव मदत.

Bhairav Diwase
निधी गोळा करण्याकरिता माना आदीम जमात मुंबईच्या सर्व तालुका शाखा माना आदीम जमात समन्वय समिती तथा आदीम जमात सांमुहिक विवाह समितीचे मोलाचे योगदान.
Bhairav Diwase.    July 01, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:-जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे महाराष्ट्र राज्याच्या अनेक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे जागतीक आरोग्य संघटननेने कोरोना या विष्णुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करून त्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता नियमावली व अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यात.

     कोविड १९चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जारी केलेल्या लॉकडाऊन मुळे राज्यावर गंभीर परिस्थिती उधभवली असल्यामुळे या आपत्तीस सामोरे जाण्यासाठी आर्थिक साहाय्य आनी मदत व पुनर्वसन कामास हातभार लागावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ मध्ये मदतीचे आवाहन केले.

   माना आदीम जमात मुंबई ही संस्था सामाजिक प्रश्नांसोबतच अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असते त्यामुळे मंडळाच्या वतीने समाजघटकाकडे यथाशक्ती मदत करण्याची विनंती आली या विनंतीला मान देऊन समाजातील अनेक समाजबांधवांनी निधी गोळा करून मंडळाकडे सुपूर्द करण्यास सुरुवात केली मुख्यमंत्री साहाय्यता निधी करिता गोळा झालेला  २,४६,२४८(दोन लाख सेचासळीस हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये) धनादेश मा. मुख्यमंत्री यांना सुपूर्द कारण्यात आला.

  सदर निधी गोळा करण्याकरिता माना आदीम जमात मुंबईच्या सर्व तालुका शाखा माना आदीम जमात समन्वय समिती तथा आदीम जमात सांमुहिक विवाह समितीचे मोलाचे योगदान आहे.