पॉझिटीव्ह रुग्णाच्या परिवारातील तीन सदस्य पत्नी, मुलगी व मुलगा यांचा पॉझिटीव्ह.
Bhairav Diwase. July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर येथे आणखी तीन बाधित रुग्ण आढळले असून टीचर कॉलनीतील आसाम येथे प्रवास करून आलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आला होता. आता त्याच पॉझिटीव्ह रुग्णाच्या परिवारातील तीन सदस्य पत्नी, मुलगी व मुलगा यांचा पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त आहे.
सदर परिसर या पूर्वीच प्रतिबंधित केला आहे तरी सुद्धा नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.