Top News

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणा-या नराधमास फाशी द्या.

सौ.किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच, घुग्घुस यांची मागणी.
Bhairav Diwase.    July 25, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- महाराष्ट्र सरकार "बेटी बचाओ-बेटी पढाओ" अभियान राबवत आहे. परंतु समाजात कायद्याची भीतीन राहिल्याने महिलांवर अत्याचार व बलात्कारांच्या घटना घडत आहे. महिला सुरक्षित नसल्याने दिवसेंदिवस महिलांबाबत सुरक्षेचा प्रश्न फार गंभीर आणि चिंतेचा विषय बनला आहे .

महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना दि. २३ जुलै रोजी दुपारच्या सुमारास पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव येथे ५० वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने सर्वत्र घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहे.


पिडित मतिमंद मुलीचे आईवडील शेतात काम करायला गेले असता पीडित मतिमंद असल्यामुळे मुलगी ही घराबाहेर असताना अचानक गावातीलच वासुदेव मोहुर्ले ५० वर्षीय नराधमाने संधीचा फायदा घेत पीडितेच्या हाथ पकडून स्वतःच्या घरी नेले व लैंगिक अत्याचार केला.


घटनेचे गांभीर्य समजले असता आईवडिल यांनी पाथरी पोलीस स्टेशनं गाठून तक्रार दाखल केली. या आधी एका दोन वर्षीय चिमुकलीवर अंगणात खेळत असतांना हात धरुन नेऊन एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला होता.


एका मागुन एक लैंगिक अत्याचाराच्या तिसऱ्या घटनेने संपुर्ण समाजमन सुन्न झाले असुन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस प्रशासन तसेच कठोर कायदे असतांना सुद्धा घडणाऱ्या घटनांमुळे महिला व अल्पवयीन मुली कितपत सुरक्षित आहे असे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अश्या नराधमास जाहिर फाशी देण्यात यावी व या निंदनीय घटनेचा आम्ही निषेध करतो असे मनोगत सौ किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच घुग्घुस यांनी व्यक्त केले.


अश्या नराधमास फाशीची शिक्षा देण्यात यावी. अश्या मागणीचे निवेदन घुग्घुस पोलीस निरिक्षक राहुल गांंगुर्डे यांना सौ. किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच, घुग्घुस यांना दिले आहे.


निवेदन देतांना घुग्घुस भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा व ग्रापं सदस्या पुजा दुर्गम, ग्रापं सदस्य सुचिता लुटे, ग्रांप सदस्य वैशाली ढवस, सुनंदा लिहितकर, सुनिता पाटील, सोनु बाहादे, प्रिती धोटे, खुशबु मेश्राम, शितल कामतवार, साक्षी गायकवाड, अमिषा वंजारी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने