भाजयुमो विद्यार्थी आघाडी तर्फे मा. मुख्यमंत्री म.रा. यांना निवेदन सादर.
Bhairav Diwase. July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
राजुरा:- मुंबई येथील दादर पूर्व भागात असणारे 'राजगृह' हे निवासस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विशेषतः त्यांचा पुस्तकांसाठी बांधलं होतं. आता या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांच्या राजगृहाच्या खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलेल आहे.
मुंबई येथे दि. 7/07/2020 रोजी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईच्या दादरमधील निवासस्थान राजगृह येथे काही अज्ञातांनी भ्याड हल्ला करून तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये राजगृहाच्या परिसरातले सी. सी. टी. व्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्याचं नुकसान झालंय. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेले आहे. हा प्रकार अमानवीय व माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
त्याकरिता योग्य ती चौकशी करून घटनेतील निवासस्थान राजगृहमध्ये भ्याड हल्ला करून तोडफोड करणाऱ्या त्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी त्याकरिता आज दि. 9 जुलै 2020 रोज गुरवारला भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी राजुराचे तालुका अध्यक्ष राहुल थोरात तसेच तालुका महामंत्री छबिलाल नाईक यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदार राजुरा मार्फत मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे म. रा., तसेच गृहमंत्री अनिलजी देशमुख म. रा. यांना निवेदन देऊन भाजयुमो विद्यार्थी आघाडी तर्फे तिव्र निषेध करण्यात आले.
त्याकरिता योग्य ती चौकशी करून घटनेतील निवासस्थान राजगृहमध्ये भ्याड हल्ला करून तोडफोड करणाऱ्या त्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी असे निवेदनातून विनंती करण्यात आली.
त्याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, भाजयुमो वि. आ. राजुराचे तालुका अध्यक्ष राहुल थोरात, तालुका महामंत्री छबिलाल नाईक, भाजयुमो वि. आ. शहर अध्यक्ष सुधीर अरकिलवार, शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा, युवा नेते हरीश ब्राह्मणे, युवा नेता प्रणय भोगा, राहुल जगत, उपस्थित होते.