मुल तालुक्यात आणखी दोन पाॅझिटिव्ह.

Bhairav Diwase
मुल तालुक्यातील जानाळा येथे 2 कोरोना पाझिटिव्ह आढळल्याने खळबळ माजली आहे.
Bhairav Diwase.    July 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- दोन दिवसापूर्वी जाणाळा येथे लग्न समारंभ झालं होतं. या लग्न सोहळ्यात ऊर्जानगर येथील एक महिला सहभागी झाली होती. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, आरोग्य यंत्रणेने या लग्न सोहळ्यात सहभागी सर्वांचे स्वॅब नमुने घेतले होते. यापैकी वधु आणि तिच्यासोबतची एक महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याने आज प्रशासनाने जाणाळा येथे जाऊन या पॉझिटिव महिलांच्या संपर्कात झालेल्यांचे स्वॅब घेणे सुरू केले.

बेंबाळ येथील एक युवक देखील कोरोना पॉझिटिव निघाल्याने आज मूल तालुक्यात कोरोना चे रुग्ण संख्या तीन झाली आहे.