शेतकऱ्यांचा मित्र... साप

Bhairav Diwase
0
लेखक:- श्रीकांत व्ही. शेंडे
           पोंभुर्णा
           मो. नं:- 8275215380

(भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. आदिम जमातीत वृक्षांना व प्राणांना आपला कुलदैवत, आराध्यदैवत मानण्याची प्रथा होती.त्यातील भगवान शिवशंकरच्या गळ्याभोवती नागाचे वास्तव्य असल्याचे सापाचे पूजन म्हणजेच आजची श्रावण महिन्यातील नागपंचमी.)
   
      सापाची उत्क्रांती ही प्रागैतिहासिक काळातील विशिष्ट सारड्यांपासून झाली असे दिसते. उत्क्रांतीच्या काळात त्यांचे शरीर लांब व निमुळते झाले व त्याच वापरात नसलेले पाय गायब झाले. समृद्ध पर्यावरण ही नामवल्ली म्हणजे आजची उपजलेली नामवल्ली नाही. ख्रिसपूर्व ६००० वर्षांपूर्वीच्या काळापासून वनसंवर्धनाच्या संबंधाने अलिखित कायदे होते. वन संवर्धनाच्या दिशेने उमटलेले अलिखित कायदे असले तरी त्या वेळेस ते शर्थीने पाळल्या जायचे. भारतवर्षात वनांचे, प्राण्यांचे योग्य रक्षण व संवर्धन व्हावे यासाठी प्रत्येक आदिम जमातीतल्या लोकांची एक नियमावली होती. ही नियमावली ते आपल्या प्राणपलीकडे जपायचे. त्यांचे रक्षण करायचे तरी वन, वन्यप्राणांच्या संरक्षणासाठी आदिम जमातीची सशक्त रूढी व परंपरा होती. बऱ्याच आदिम जमातीत वृक्षांना व प्राणांना आपला कुलदैवत, आराध्यदैवत मानण्याची प्रथा होती. त्यातील भगवान शिवशंकरच्या गळ्याभोवती नागाचे वास्तव्य असल्याचे सापाचे पूजन म्हणजेच आजची नागपंचमी.
        नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्यालायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात. भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो, तर काहींना शून्याचा आकडा (monocolour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहीत. नागाची लांबी बरीच, म्हणजे सरासरी लांबी १.२ ते २.५ मीटर असते. नागाच्या अंगावरील खवले हे गव्हाच्या आकाराचे असतात.
       उंदीर, बेडूक, सरडे, इतर छोटे प्राणी व पक्षी हे नागाचे मुख्य खाद्य आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडून नाग शेतकर्‍याला मदत करत असतात. माणूस हा नागाचा मुख्य शत्रू आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रूंमध्ये मुंगूस, गरुड, कोल्हे, खोकड,
अस्वल यादी आहेत. नाग शिकार करताना प्रामुख्याने आपल्या विषाचा उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बघतो व भक्ष्य मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पूर्णपणे गिळतो.नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे!) व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत पहारा देतो.
     दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात. नाग चावला आहे या भीतीनेच बहुतांशी माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाहीत, केलाच तर त्याच्यामागे संरक्षण हाच हेतू असतो.जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होऊ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural system वर परिणाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्ला माणूस विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास तो असमर्थ होतो. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव जाण्यास अंदाजे एक तास ते दीड दिवस लागू शकतो.
     महाराष्ट्रातील काही जाती हे नागांचे वंशज आहेत. सातवाहन राजे नागकुलातले होते. ईशान्य भारतात बोलल्या जाणार्‍या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नाग जमातीचे लोक भारताचे नागरिक आहेत. त्यांची वस्ती प्रामुख्याने नागालॅंड प्रांतात आहे. नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत.
लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात.
नाग दूध पितो - वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे नाग दूध पीत नाही.
नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.
नागिणीला मारले तर नाग डूख धरणे असे म्हणतात.सापांची स्मरण शक्ती विकसीत झालेली नाही.त्यामुळे साप डूख धरू शकत नाही
नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो. गारुडी मूर्ख बनवितात ते बेंझाईन चे खडे वापरतात.नागमणी नसतो.
नागाला अनेक फणे असू शकतात. एकच फणा असतो. आदिम जमातीतील चालत असलेली परंपरा आजही नाग पूजन म्हणजेच नागपंचमी साजरी करतात दिसते आहे. म्हणून साप संरक्षणासाठी या सणाचं महत्वाचं योगदान वाटतो.


लेखक:-श्रीकांत व्ही.शेंडे
           पोंभुर्णा
   मो. नं:- 8275215380
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)