Click Here...👇👇👇

रासेयोचा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्काराचा मान गोंडवाना विद्यापीठाला. #Gadchiroli #Gondwanauniversity #Chandrapur

Bhairav Diwase
वाचा सविस्तर गोंडवाना विद्यापीठला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी, उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक, सर्वोत्कृष्ट महाविद्यालय.
गडचिरोली/चंद्रपूर:- केंद्र शासनाच्या पध्दतीवर आधारित राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासुन म्हणजे सन 1993-94 पासून राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत नि:स्वार्थ भावनेन व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्या त्याच्या प्रोत्साहन मिळन्यासाठी गौरव करण्याच्या दृष्टीने पुरस्कार दिल्या जाते. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठास सन 2020-21 चा राज्यशासनाचा सर्वात्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. #Gadchiroli  #Chandrapur


गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील पुराग्रस्तांना तीन ते साडेतीन कोटीचे अन्नधान्य वाटप करण्यात आले होते. कोविड 19 च्या महामारीच्या काळात रासेयोच्या जन जागृती करून अंदाजे 2 लाख मास्कचे वाटप तसेच ग्रामीण भागात अन्नधान्यचे वाटप करण्यात आले. महामारीच्या काळात सुध्दा रासेयो विभागामार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक सेवेत सक्रिय भूमिका राहिली आहे. #Gondwanauniversity
महाराष्ट्र राज्य सरकारने 2020-21 च्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठचा पुरस्कार गोंडवाना विद्यापीठला देऊन गौरवण्यात आले. सोबतच विद्यापीठाचे रासेयो चे माजी समन्वयक डॉ. नरेश मडावी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम समन्वयक पुरस्कार तर प्रा. गुरुदास बलकी यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी प्राप्त झाला. #Adharnewsnetwork

तसेच उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार कु. प्रिंयका ठाकरे म. गांधी व एन पी महाविद्यालय आरमोरी तसेच शिवाजी महाविद्यालय राजुरा या महाविद्यालयास सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार देण्यात आले.
राज्य सरकारकडून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले असल्याने गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. श्रीनिवास वरखेड़ी प्र. कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे तथा रासेयो संचालक डॉ. श्याम खंडारे यांनी व विविध स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.