Click Here...👇👇👇

ग्रंथालयाचे जनक डॉ.एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी. #Pombhurna

Bhairav Diwase

पोंभुर्णा:- स्थानीय पोंभुर्णा येथे दि.12/8/2021 ला चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स आणि चिंतामणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.एस आर रंगनाथन ग्रंथालयाचे जनक यांची जयंती साजरी करण्यात आली. आजचा दिवस राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून साजरा करण्यात आला . आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य डॉ. टि.एफ.गुल्हाने होते. प्रमुख पाहुणे म्हणून चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एच. पठाण मंचावर उपस्थित होते. त्यांनी प्राध्यापकांना उपदेश करत ते म्हणाले, प्राध्यापक आणि नेहमी ग्रंथालयात वाचन पठण करीत असणे फार आवश्यक आहे.


आज जगात ग्रंथालय हे आधुनिक संगणक प्रणाली युक्त असली पाहिजे. तेव्हाच आजच्या कोरोना च्या काळात प्रत्येकांना माहिती आपण देऊ शकतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. टि.एफ. गुल्हाने उद्देश करत म्हणाले आज ग्रंथालय चे पारंपारिक संकल्पना कमी होत आहे .आज ग्रंथालय आधुनिक प्रणाली सुसज्जित असायला पाहिजे तेव्हाच आपण विद्यार्थ्यांना प्राध्यापकांना माहिती देऊ शकतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक दिलीप विरुटकर( ग्रंथपाल) तसेच आयोजक प्राध्यापक विजय बुधे( ग्रंथपाल) कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमात दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.