🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

संशोधन कार्यात ग्रंथालयाचे फार मोठे महत्त्व:- डॉ. सुधीर हुंगे. #Pombhurna


पोंभूर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती ग्रंथपाल दिन म्हणून दिनांक १२ आगष्ट ला साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक विठ्ठल चौधरी राज्यशास्र विभाग प्रमुख चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, प्राध्यापक संतोष कुमार शर्मा, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर हुंगे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुधीर हुंगे यांनी ग्रंथालयाला महाविद्यालयाचा ह्रदय असे म्हटले.

महाविद्यालयीन जीवनात त्याचप्रमाणे संशोधन कार्यामध्ये विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे खूप मोठे महत्त्व आहे उपस्थितांना समजावून सांगितले. त्याचप्रमाणे मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतीश पिसे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक अमोल गर्गेलवार सर यांनी केले तर पाहुण्यांचे आभार प्रा. चंद्रकांत वासेकर सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत