पोंभूर्णा:- शिवसेनेच्या जुनगाव महिला गाव प्रमुख श्रीमती शीला झबाडे यांना अश्लील अपशब्द वापरून शिवीगाळ व धमकावले प्रकरणी जुनगाव येथील इसमा विरोधात मुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. #Pombhurna
मुल पोलीस ठाण्यात अंतर्गत जुनगाव येथे राहणाऱ्या व शिवसेनेच्या गाव प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या शीला झबाळे यांना येथीलच एका तुळशीराम शेंडे या इसमाने भर चौकात अतिशय खालच्या दर्जाचे शब्दाचा वापर करून शिवीगाळ केली व मारण्याची धमकी दिली. घटनेची तक्रार बेबाळ पोलीस दूरक्षेत्र येथे दाखल केली असून विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती आहे. सदर व्यक्तीवर कोणती कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. #Adharnewsnetwork
सदर व्यक्तीने मोठमोठ्याने आरडाओरडा करत हातात भलीमोठी लाठी घेऊन शिला यांना अश्लील, अपशब्द वापरून शिवीगाळ केली. तसेच दमदाटी व धमकी दिली.
तक्रारीवरून विविध कलमांखाली पोलिसांनी तुळशीराम शेंडे या इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत ठावरे यांच्या नेतृत्वात परचाके मेजर, जुमनाके, गायकवाड करीत आहेत.