सिंदेवाही हद्दीत मुल पोलीसाची अवैध दारूवर धाड.

Bhairav Diwase

शिवणी ता.सिंदेवाही येथील आकाश दिलीप सोनूले वय २५ वर्ष यांच्या घरातून दारुचा साठा जप्त.
Bhairav Diwase.    July 05, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:-
उपविभागीय पोलिस अधिकारी, मुल यांचे आदेशानुसार मुल, सिंदेवाही पोलिस स्टेशन चे हद्दीमध्ये प्रोव्हिशन रेडकामी पेट्रोलींग करीत असता, मुखबिरच्या गुप्त माहितीनुसार, शिवणी ता.सिंदेवाही येथील आकाश दिलीप सोनूले वय २५ वर्ष हा आपल्या चारचाकी रिड्झ गाडीमध्ये देशी दारूचा साठा ठेवून, आपले घराबाहेर बिना नंबरच्या अॅक्टीवा गाडीने बाहेरून येणाऱ्या चिल्लर विक्रेत्यांना दारू पुरवठा करीत असल्याचे पक्क्या माहितीनुसार ठिकाणावर पोचून दिलीप सोनूले याचे घराची झडती घेतली असता, त्याचे घरातील पलंगाखाली एका प्लॉस्टीक चुंगळीमध्ये विक्रीसाठी ठेवलेले १०० नग देशी दारू पव्वे, दोन खर्ड्याचे खोक्यात २०० नग असे एकूण ३०० नग रॉकेट देशी दारूचे पव्वे मिळून आले. तसेच त्याचे घरासमोर उभी असलेली चारचाकी रिड्झ गाडी क्र.- एम. एच.- ३४, ए. ए.- ४००७ ची पाहणी केली असता, २ खर्ड्याचे खोक्यात २०० नग रॉकेट संत्रा देशी दारू, ६ खर्ड्याचे खोक्यात ६०० नग टॉयगर ब्रॅंड संत्री ५०००, असे एकूण ८ खर्ड्याचे खोक्यात ८०० नग रिड्झ गाडीचे डिक्कीमध्ये मिळून आले. तसेच त्याचे अंगझडतीत दोन मोबाईल फोन मिळाले ते सुद्धा जप्त करण्यात आले.
त्यानुसार १,००,०००/- रुपये देशी दारू, ६,००,०००/- रुपये किंमतीची चारचाकी, ७०,०००/- रुपये किंमतीची बिना नंबरची एक्टिवा दुचाकी, ८,०००/- रुपये किंमतीचा रिअलमी मोबाईल व १०००/- रुपये किंमतीचा सॅमसंग मोबाईल असा एकूण ७,८९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोक्यावर ७-३० ते ८-३० दरम्यान जप्ती पंचनामा केला असून, आरोपीस दारूसाठा कुठून आणला असे विचारले असता, त्याने १) अमित उर्फ पिंटू रमेश भरडकर २) मयूर देवकुमार भैसारे दोन्ही रा. सिंदेवाही यांचे नाव पंचासमक्ष सांगितले असल्याने देशी दारूसाठा बाबत मुल पोलिस स्टेशन ला अ. क्र. ०२/२०२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपी १) आकाश दिलीप सोनूले, वय २५ वर्षे रा. शिवणी २) अमित उर्फ पिंटू रमेश भरडकर वय ३१ वर्षे, ३) मयुर देवकुमार भैसारे वय २३ वर्षे दोघेही राणार सिंदेवाही जि. चंद्रपूर यांचे विरूद्ध कलम ६५ ( इ ), ८३ मदाका नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, अटक केली आहे. सदर ची कारवाई पी.एस.आय. राठोड, पो. हवा. गुलाब बलकी, महेश पतरंगे, ना. पो. का. प्रभाकर गेडाम, पो. स्टे. मुल यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास आय. पी. एस. अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. राठोड हे करीत असल्याचे पोलीस सुत्रांनुसार कळविले आहे.