प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे प्रहार संघटना पाथरीचा वतीने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा.
Bhairav Diwase. July 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मिथुन मेश्राम, पाथरी सावली
सावली:- तालुक्यातील पाथरी येथे प्रहार संघटना पाथरीच्या वतीने मा. ना. बच्चू भाऊ कडू ( ऊर्जामंत्री, शिक्षण राज्य मंत्री) यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सावली तालुक्यातील मोठे परिसर असलेल्या पाथरी या गावी आज दिनांक ०५/०७/२०२० रोजी मा. नामदार बच्चू भाऊ कडू (ऊर्जामंत्री, शिक्षण राज्यमंत्री) यांचा ५४ वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने प्राथमिक आरोग्य केंद्र पाथरी येथे प्रहार संघटना पाथरीचा वतीने वृक्षारोपण करून साजरा करण्यात आले .
कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावाणे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे कोरोना विषाणूच्या काळातील नियमांचे काटेकोर पालन तसेच भान ठेवून प्रहार संघटना पाथरीच्या वतीने वृक्षारोपण करून "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे" या म्हणीला साजेल आणि शोभेल असे उपक्रम हाती घेऊन पर्यावरणाला पोषक असे तालुक्यात तसेच पाथरी परिसरात आदर्श ठेवला आहे .
यावेळी प्रहार संघटना पाथरी सेवक मा. प्रफुल तुम्मे,मा. उमाजी भैसारे, मा. राकेश चेन्नूरवार, मा. कमलेश वानखेडे,मा. अविनाश इरबतनवार( माजी आर्मी सैनिक), मा.भुजंग वाणी, मा. प्रशांत उंदिरवाडे, मा. प्रवीण वाघमारे,मा. हरिदास चौधरी, मा. चेतन वालदे, मा. भास्कर वालदे,उदय मडावी, वैभव येरमे, आशिष नेवारे, मिथुन मेश्राम आदी उपस्थित होते.