भिसी येथे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रमुख उपस्थितीत दिला धनादेश.
Bhairav Diwase. July 01, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- भिसी येथे दिनांक ०६/०५/२०२० ला वादळी पावसाने इमारत कोसळून श्री शगिर हैदर शेख यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यामुळे त्यांचे कुटुंबावर खुप मोठे संकट आले होते या घटनेची दखल घेत चिमूर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी स्वतः तात्काळ मदत केली व लवकरात प्रशासनाकडू आर्थिक मदत मिडवून देण्याचा शब्द त्यांच्या कुटुंबाला दिला होता दिलेला शब्द पाडत आज दिनांक ०५/०७/२०२० रोजी भिसी येथे त्यांचे राहते घरी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे प्रमुख उपस्थितीत चिमूर तहसीलदार संजय नगतीळक यांनी मृतक शगिर शेख यांच्या पत्नी श्रीमती शमशाद शगिर शेख यांना ४,००,०००(चार लक्ष) रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
या वेळी भाजपा जेष्ठ नेते श्री वसंतभाऊ वारजुकर, बापुरावजी बोमेवार, गोपालजी बलदुवा, पंचायत समिती सदस्य प्रदिप कामडी मनोहरजी मुंगले, युवा मोर्चा अध्यक्ष किशोर मुंगले, भिसी आंबोली जिल्हा परिषद प्रमुख नितिन गभने, सरपंच योगिता गोहणे, उपसरपंच लीलाधर बन्सोड देवेंद्र मुंगले उपस्थित होते.