सुनांनी दिला सासऱ्याच्या पार्थिवाला खांदा. राजुरा येथील पोटे परिवारातील कर्तव्यदक्ष सुनांनी पाडला नवा सामाजिक पायंडा.

Bhairav Diwase
अंत्ययात्रेदरम्यान पोटे यांच्या सुना सिंधू व शारदा पोटे यांनी आपल्या सासर्‍याच्या पार्थिवाला खांदा देऊन अखेरचा निरोप.
Bhairav Diwase.    July 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक)भैरव दिवसे, जिल्हा चंद्रपूर
राजुरा:- मुलींनी आपल्या वडिलाला अंत्ययात्रेत खांदा दिल्याचे ऐकले असेल. पण, राजुर्‍यात मुलांसोबत सुनांनीही आपल्या सासर्‍याच्या पार्थिवाला खांदा देण्याचे उदाहरण पोटे कुटुंबात बघायला मिळाले. 

राजुरा शहरातील देशपांडे वाडी येथील रहिवासी प्रतिष्ठित नागरिक श्यामसुंदर उरकुडाजी पोटे (95) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी (3 जुलै ) पहाटेच्या सुमारास निधन झाले.

बल्लारपूर येथील वेकोलिचे सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक पुरुषोत्तम पोटे यांचे ते वडील होते. पोटे यांच्या मृत्यू पश्च्यात सहा मुले, सुना, नातवंड असा आप्तपरिवार आहे. 


त्यांच्या अंत्ययात्रेसाठी परिवारातील मर्यादित नागरिक उपस्थित होते. अंत्ययात्रेदरम्यान पोटे यांच्या सुना सिंधू व शारदा पोटे यांनी आपल्या सासर्‍याच्या पार्थिवाला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला.