ग्रामीण क्षेत्रातील शाळा सुरू करण्यात येण्याच्या संदर्भात तथा स्थानिकांना आपल्या क्षेत्रांमध्ये रोजगारात प्रथम प्राधान्य देण्यात यावे अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा.
Bhairav Diwase. July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपुर:- दिनांक ०६/०७/२०२० महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री (नगर विकास, ऊर्जा, तंत्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन आदिवासी विकास व पुनर्वसन) तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री नामदार श्री. प्राजक्त तनपुरे साहेब यांच्या हस्ते राजुरा येथे राष्ट्रवादी युवक कांग्रेस शहर राजुरा शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी वैद्य, युवक जिल्हाध्यक्ष नितीनजी भटारकर, महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, तालुकाध्यक्ष संतोष देरकर, विधानसभा युवक चे अध्यक्ष कुणाल गायकवाड, तालुका युवकचे अध्यक्ष आसिफ सय्यद, शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, युवकचे शहर अध्यक्ष स्वप्निल बाजूजवार, नदीम शेख, ऑस्टिन सावरकर, सतीश तेलजिरवार, वतन बक्सेरिया, प्रणय धोटे, अजय ढुमने, राहुल धोटे, साहिल शेख कार्तिक सोमलकर, शिवचरण जाधव यासह पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांनी मंत्रीमहोदय यांच्यासोबत ग्रामीण क्षेत्रातील शाळा सुरू करण्यात येण्याच्या संदर्भात तथा स्थानिकांना आपल्या क्षेत्रांमध्ये रोजगारात प्रथम प्राधान्य देण्यात यावे अश्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली.