मुल तालुक्यातील नागरिकाचे तीन महिन्याचे विज बिल सरसकट माफ करा:- भाजपा तालुका मुल

Bhairav Diwase
भाजप मुल यांच्याद्वारे तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना निवेदनातून मागणी.
 Bhairav Diwase.    July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- संपूर्ण भारत देशात कोविड -19 या काळात टाळेबंदी असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक व्यावसायिक शेतकरी घरी बसून राहावे लागले अशातच तीन महिन्याचे वीज बिल एकाच वेळी पाठविले असल्याने सर्व जनतेसमोर विज बिल भरणे बाबत मोठे संकट निर्माण झाले आहे चंद्रपूर जिल्हा औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारखाने असल्यामुळे मजुरांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे मात्र मार्च महिन्यात देशासह राज्यात टाळेबंदी केल्यामुळे मजुरांच्या रोजगार हिरावला गेला असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून गरिबावर होणारे आर्थिक संकट दूर करावे अशा मागणीचे निवेदन भाजपा मुलांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना तहसीलदार यांच्या मार्फतीने निवेदन सादर करून मागणी केली आहे निवेदन सादर  करताना नगराध्यक्ष प्रा. रत्नमाला भोयर भाजपा शहर अध्यक्ष प्रभाकर भाऊ भोयर नगर परिषदेचे उपाध्यक्ष   नंदकिशोर रणदिवे ,नगरसेवक अनिल साखरकर  नगरसेवक प्रशांत समर्थ व इतर कार्यकर्ते