कोरपना तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने सदस्य अभियानाला मोठ्या जोरात सुरुवात.

Bhairav Diwase
कुटुंब सर्वेक्षण फार्म भरून देण्यास नागरिक अतीउत्साहित:- श्री नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना 
Bhairav Diwase.    July 14, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुका हा अतिदुर्गम भागात वसलेला असून येथे आदिवासी गोरगरीब दलित शोषित पीडित म्हणून ओळखला जातो येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक 14/07/2020 रोज मंगळवार ला मोठ्या उत्साहात सदस्य अभियानाला सुरुवात झालेली आहे या सदस्य अभियानात अनेक नागरिकांनी भाग घेतलेला आहे व कुटुंब सर्वेक्षण फार्म भरून देण्यास नागरिकांनी उत्सुकता दर्शवलेली आहे श्री नारायण हिवरकर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष यांनी सदस्य अभियाना अंतर्गत येरगव्हाण येथे घरोघरी जाऊन सदस्य अभियान राबवले असता सर्व नागरिकांनी उत्सुकता दाखवलेली आहे स्वतः तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी फार्म भरून याअभियानाचे महत्व पटवून दिले व केंद्र शासनाच्या योजना बद्दल माहिती दिली अभियानात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला याबद्दल तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर यांनी सर्व ग्रामस्थाचे आभार मानले.