चिमूर विधानसभा क्षेत्रात पुरविले प्रतिबंधित साहित्य.
आजही सुरू आहे कोविड केअर सेंटर चिमूर येथे अविरत भोजन व्यवस्था.
Bhairav Diwase. July 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार बंटीभाऊ भांगडीया यांची ओळख ही क्षेत्रासोबत राज्यात परिचित आहे
राजकारण सोबत भरीव समाजसेवेचा वसा निरंतर ठेवणारे आमदार बंटीभाऊ भांगडीया आहेत जगासह देशात कोरोना कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढला असताना जनतेच्या सेवेसाठी तत्परता दाखवून त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला कोरोना प्रतिबंधित साहित्य सह जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा त्यांनी स्वखर्चातून पुरविले असताना त्यांनी क्षेत्रासोबत जिल्ह्यातील नागरिक आपल्या आपल्या गावाकडे आणण्यासाठी भरपूर प्रयत्न करीत सहकार्य करण्याचे कार्य केले त्यामुळे आमदार बंटीभाऊ भांगडीया हे कोरोना वायरस चे योद्धा खरे ठरले आहे ताळेबंदी काळात चिमूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक घरात चूल पेटावी व कुणीही उपाशी राहू नये म्हणून स्वतः जीवाची पर्वा न करता कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रत्येक गरजू गावात त्याचप्रमाणे शहरात किराणा किट व अन्नधान्य वाटप केले.
*हजारो मास्क,साबण व स्यानिटायझर वाटप*
कोरोना कोविड 19 मुळे लॉक डाउन सुरू झाले असताना क्षेत्रातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी त्यांनी दिवस रात्र एक करीत ते लक्ष केंद्रित ठेवीत होते त्यांचा भ्रमणध्वनी सतत खनखणत होता मदतीचा सातत्याने पुरवठा करीत होते कोरोना वर मात करण्यासाठी त्यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रात साबण ,सॅनिटाइझर,मास्क प्रत्येक घरोघरी पुरविले तसेच भोजन व्यवस्था सुद्धा चिमूर शहर ,नेरी भिसी ,नागभीड येथे दोन्ही वेळ चे जेवण कम्युनिटी किचनच्या माध्यमातून पुरवठा करण्याचे महान कार्य त्यांच्या हातून झाले आमदार बंटीभाऊ भांगडीया हे स्वतः भोजन व्यवस्था पुरविण्यासाठी कार्यकर्त्यांना मदत करीत होते व आहेत तसेच बारा बलुतेदार मधील काही समाज घटकांना किराणा किट सुद्धा पुरविण्यात आली टाकळेबंदी काळात बाहेर राज्यातील मजूर विधानसभा क्षेत्रात अडकले असता त्यांनी अशा कुटुंबाना अन्नधान्य व्यवस्था व आर्थिक मदत पुरविली.
बाहेरून ठिकानून आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगिकरन मधील नागरिकांना दोन्ही वेळेचे जेवण पुरवठा करण्याचे कार्य आजही सुरू आहे परजिल्हा मधून आलेल्या नागरिकांना वाहन व्यवस्था करीत त्यांनी अल्पोहर चहा पाणी सुद्धा केले
विधानसभा क्षेत्रातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहन धारकांना सुद्धा किराणा किट वाटप केली कोरोनामुळे ताडोबा पर्यटन बंद झाल्याने जिप्सी चालकांना सुद्धा मदतीचा हात देत किराणा किट वाटप केली.
*जीवाची पर्वा न करता जीवनावश्यक साहित्य वाटप*
कोरोना कोविड मध्ये भीतीचे वातावरण असताना मात्र आमदार बंटीभाऊ भांगडीया हे धर्याने न घाबरता जनतेच्या सेवेसाठी लढत होते शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मदत आणि जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी सतत कार्यशील राहत होते आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी कोरोना कोविड संदर्भात केलेले कार्य वाटसप माध्यमातून अध्ययन करीत त्यामधून संकलन करीत असताना चिमूर सह विधानसभा क्षेत्रात सतत एक महिन्यासाठी ३५ हजार च्या वर लोकांना दोन्ही वेळची भोजन व्यवस्था केली गरजू कुटूंबाना १५ हजार ८८०च्या वर गरजु ना जीवनाश्यक वस्तू किट वाटप केली ९५ हजार लोकांना प्रत्येकी एक मास्क व सॅनिटाईजर बॉटल चे वितरण केले तसेच 1लक्ष ४६ हजार डेटॉल साबण वाटप केले
कोरोना कोविड संकट दरम्यान मध्ये सुद्धा गोर गरीब जनतेची सेवा कार्य करीत मदतीचा हात सतत सुरू आहे
स्व गोठूलाल भांगडीया व भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्षेत्रातील कुटुंबात पहिली मुलगी झाल्यास (५०००)पाच हजार रुपयांचा धनादेश दान करण्याचे सेवा कार्य सुरू असून आजच्या वाढदिवसाला ६६ कन्यारत्न लाभार्थ्यांना पाच हजार रुपयांचा धनादेश वाटप करणार आहे.
*रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा*
चिमूर विधानसभा क्षेत्र असो की दुसरे कुठलेही क्षेत्र असो आरोग्याचा प्रश्न आला की आमदार बंटीभाऊ भांगडीया हे आवर्जून मदत करतात सामाजीक कार्यात मदत करण्याचा वसा त्यांना वडिलोपार्जित प्राप्त झाला आहे रुग्ण कुठल्याही प्रकारचा असो त्यांनी आवाज दिला तर मदत ही मिडालीच आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी स्वतः अनेक प्रकारच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया ह्या स्वखर्चाने केल्या आहेत रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून त्यांचे कार्य आजही निरंतर सुरूच आहे.व ते पुढेही सुरूच राहणार आहे.
*शिक्षण क्षेत्रात भरीव कामगीरी*
चिमूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक कमकुवत कुटुंबातील विद्यार्थी हा उच्चशिक्षित व्हावा म्हणून अनेक विद्यार्थ्यांची फी ही आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी भरलेली आहे वैद्यकीय शिक्षण असो की अभियांत्रिकी,अशा प्रत्येक शिक्षण क्षेत्रात त्यांनी स्वतः मदत करून मोलाची कामगिरी निभावली आहे.
आमदार बंटीभाऊ भांगडीया हे राजकीय क्षेत्र सोबत सामाजिक क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणारे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या महान कार्यास सलाम करीत असून त्यांच्या वाढदिवस निमित्य आरोग्य सुदृढ राहून युवा सुशिक्षित बेरोजगाराना काम मिळवून देऊन मजबूत करावे हीच सदिच्छा.
आदरणीय बंटीभाऊ आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी सुभेच्छा*💐💐💐🎂🎂🎂
शुभेच्छुक:- मित्र परिवार