Top News

आ. सुधीरभाऊ हे विकासाची दूरदृष्टी असणारे नेते:- माजी आमदार सुदर्शन निमकर.

कोरोणा प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वितरण.

Bhairav Diwase.    July 30, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:-
जनतेच्या हितासाठी सातत्याने लढा देणारे, विकासाची दूरदृष्टी असणारे सुधीरभाऊ हे असामान्य व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे चंद्रपूर जिल्ह्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना मिळाली. जिल्ह्याचे नाव देशात उज्ज्वल करणारे सुधीरभाऊ हे युवा लोकप्रतिनिधीसाठी आदर्श आहेत असे प्रतिपादन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी चुनाळा येथे केले.

राज्याचे माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त चुनाळा येथे आरोग्य सेविका व इतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री निमकर बोलत होते.  माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चुनाळा येथे ग्रा. प. चे सरपंच दिनकर कोडापे व उपसरपंच बाळू वडसकर यांच्या पुढाकारात दि.30.7.2020 रोजी विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यात आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या तर्फे चुनाळा येथील 1200 कुटुंबांना पुरेल एवढ्या आर्सेनिक अल्बम 30 या कोरोना प्रतिबंधात्मक गोळ्या येथील कार्यरत कोरोना योध्दा आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्या कडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आल्या.याप्रसंगी चुनाळा येथील आशा वर्कर मंदा धुर्वे, वसंता मारपेल्ली, सुनीता निमकर व सुरेखा वाघमारे यांचा जिवाची पर्वा न करता कोरोना महामारीत काम करीत असल्या बद्दल साळी-चोळी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.व तसेच चुनाळा येथील कोरोना बाधित भागात सतत काम करून परिस्थिती नियंत्रणात आणण्या करिता सतत झटत असलेले आरोग्य कर्मचारी डॉ. मालती निषाद, आरोग्य सेविका व्ही. एस. चांदेकर, वैशाली कोंडावार, आरोग्य सेवक माणिक पिंगे यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितीत जि. प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक जाधव, सरपंच दिनकर कोडापे, उपसरपंच बाळू वडस्कर, ग्रा.वि. अधिकारी गणेश राठोड, भाजयुमो विध्यार्थी आघाडी महामंत्री छबिलाल नाईक, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष केशव वांढरे  मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सुधीरभाऊंच्या अविरत सेवा कार्याबद्धल प्रकाश टाकला. व तसेच कोरोना या संकटातून स्वतःची काळजी स्वता घेऊन आपल्यासह दुसऱ्याचा सुध्दा कसा बचाव करायचा यावर चर्चा केली व ही बिमारी नष्ठ करण्या करता उपाययोजना सांगून कोरोना योद्ध्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार आरोग्य सेवक माणिक पिंगे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने