आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ, नियोजन व वन मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम.

श्री. राहुलभाऊ संतोषवार, सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, कु. अल्काताई आत्राम, सभापती पं.स.पोंभुर्णा, सौ, ज्योतिताई बुरांडे उपसभापती पं.स.पोंभुर्णा यांच्या उपस्थितीत.
Bhairav Diwase.    July 30, 2020



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- आदरणीय भाऊ आपण कोरोना सारख्या महाभयंकर काळात  लाकडडाऊन मध्ये  कोरोना महामरीच्या वेळी  जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा या करिता आपण नेहमी सरकार सोबत  सतत संघर्ष करीत राहिले. लाकडाऊन च्या काळात तालुक्याच्या ठिकाणी पोंभुर्णा मध्ये  ग्रामीण भागामधून आलेला कोणताही व्यक्ती  उपाशी राहणार नाही या उद्देशाने आपण "शिवभोजन" ची व्यवस्था केली. शासकीय कर्मचारी, अपंग, निराधार शेतकरी,शेतमजूर यांच्यासाठी  मदत कार्य केले.अशा प्रकारे  कार्य मला तरी वाटते महाराष्ट्रात, देशात सुध्दा कोणत्याही नेत्या, मंत्र्यांनी केलेले नाहीत. आपण पालकमंत्री नसतांना पालकांचे काम केले. गोरगरीब जनतेच्या हाकेला धावून येणारे चंद्रपूर जिल्ह्यात विकासाचा झंजावात आणणारे  लोकनेते विकासपुरुष आदरणीय मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थ नियोजन व वन मंत्री तथा आमदार बल्लारपूर विधानसभा यांच्या वाढदिवसा निमित्ताने "झाड असेल तर माणूस जगेल", या संकल्पने मधून केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये आष्टा, चेक आष्टा, बोर्डा बोरकर, बोर्डा झुल्लूरवार,घनोटी तुकुम, उमरी पोतदार ,सातारा भोसले,जामतुकुम, जामखुर्द,देवाडा खुर्द  इ.ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच गंगापूर नविन येथे बचत गटाला दरी देण्यात आले.या ठिकाणी श्री.राहुलभाऊ संतोषवार ,सदस्य जिल्हा परिषद चंद्रपूर, कु. अल्काताई आत्राम, सभापती पंचायत समिती पोंभुर्णा सौ.ज्योतिताई बुरांडे उपसभापती पंचायत समिती पोंभुर्णा यांनी विविध ठिकाणी वृक्ष  लागवड केले. वृक्ष लागवडीच्या  कार्यक्रमाला उपस्थित श्री.मनोजभाऊ मुलकलवार, श्री.हरिष ढवस, श्री.प्रविण चीचघरे, श्री.जयंत पिंपळशेंडे, श्री.बालाजी नैताम, श्री.गौतम रामटेके, सौ.वनिता सिडाम ,सौ. मनीषा मडावी, जनार्धन सातपुते, राकेश गव्हारे, परशुराम बुरांडे, लक्ष्मण गव्हारे, चंद्रशेखर झगडकर, बंडू लेनगुरे, राहुल सातपुते,रोशन नैताम भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत