Top News

घुग्घुस येथे मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम संपन्न.

लोकनेते सुधीरभाऊ  हेच खरे विकासपुरुष:- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे.
Bhairav Diwase.    July 30, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा 30 जुलै रोजी वाढदिवस. यावर्षी सुद्धा माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस जिल्हाभर सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

 *घुग्घुस येथे सुद्धा विविध उपक्रमाद्वारे सुधीरभाऊंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. घुग्गुस शहरात लोकाभिमुख विविध उपक्रम घेण्यात आले.* 

*यात प्रामुख्याने मोफत जन-धन खाते उघडने  तसेच पासबुक वाटप, निराधार योजना शिबिर, नवीन शिधापत्रीका वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, गोरगरिबांना व विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या नागरिकांना धान्यकिटचे वाटप करण्यात आले.*
*या दिवसाचे औचित्य साधून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने घुघुस ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दोन नवीन ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन  देण्यात आल्या. या मशीनचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नागरिकांना शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी नवीन दोन आरो मशीनचे भूमिपूजन बहादे लेआऊट व केमिकल नगर येथे देवराव भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.*

दरवर्षी मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमीत्य घुगुस व पोंभुर्णा येथे मोठ्या स्तरावर भव्य रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येत होते. या शिबिराचा लाभ जवळपास पंधरा ते वीस हजार लोक घेत होते. 
परंतु कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जमाव एकत्रीत करता येत नसल्यामुळे शिबिर घेता येत नाही. म्हणुन खबरदारी करीता, यावर्षी विविध लोकाभिमुख उपक्रमाद्वारे सेवा दिन म्हणुन सुधीर भाऊ चा वाढदिवस साजरा करण्यात आला. 

*या प्रसंगी बोलताना भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की सुधीरभाऊंचे घुग्गुस शहरावर विशेष प्रेम राहिले आहे. त्यांच्या माध्यमातून घूघूसचा सर्वांगीण विकास झाला आहे. शहरात 10 गार्डन, तीन पाण्याच्या टाक्या, प्रत्येक इलेक्ट्रिक पोलवर LED लाईट, प्रत्येक चौकात हाई मास्ट लाईट, शहरात सिमेंट रोड, नाली, प्रत्येक एरियात बोरिंग अशा अनेक गोष्टी आम्ही करू शकलो. गोरगरिबांची मदत करणारे सुधीर भाऊ खऱ्याअर्थाने विकास पुरुष आहेत. माता महांकाली त्यांना उदंड आयुष्य देवो.*
यावेळी माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने विविध लाभार्थ्यांना मोफत राशन कार्ड व जनधन बँक पासबुक चे वाटप करण्यात आले.

यावेळी घुग्गुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, जि. प. सभापती नितुताई चौधरी, प.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, सरपंच संतोष नुने, विनोद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, राजकुमार गोडसेलवार, प्रकाश बोबडे, साजन गोहने, सिनु इसारप, पूजा दुर्गम, कुसुमताई सातपुते, नंदाताई कांबळे, सुषमा सावे, तंटामुक्तीचे अध्यक्ष हसन शेख, हेमंत उरकुडे, बबलू सातपुते, मल्लेश बल्ला, पंकज रामटेके, अनिल मंत्रीवार, अनंता बाहदे, इम्तियाज अहमद, अमोल थेरे, संजय भोंगळे, प्रवीण सोदारी, सुरेश खडसे, प्रशांत चरडे, आतिश मेळावार, सुनील सिंह, सुरेंद्र भोंगळे विनोद जांजरला, नितीन काळे, शरद गेडाम, स्वप्नील इंगोले, श्रीकांत सावे, गुरुदास ताग्रपवार, मुकेश कामतवार, अजगर खान, संकेत बोढे, राजू चतकी, अतुल चोखांद्रे, विकास बरसागडे, रवी चूने, कोमल ठाकरे  संचालन वैशाली ढवस तर आभार प्रदर्शन सुचिता लुटे यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने