शिवसेना नगरसेवक विशाल निंबाळकर यांचा भाजपत प्रवेश.

आमदार मुनगंटीवार यांनी निंबाळकर यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती सुद्धा केली.
Bhairav Diwase.    July 30, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- शिवसेना नगरसेवक विशाल निंबाळकर यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत मध्ये भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला.

इतकंच नव्हे तर आमदार मुनगंटीवार यांनी निंबाळकर यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती सुद्धा केली.

वर्ष 2017 मध्ये पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षाकडून विशाल निंबाळकर निवडून आले होते.

नंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना समर्थन करून शहरातील युवकांना एकत्र करीत विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्ती पणाला लावीत अपक्ष आमदार यांना निवडून दिले.

भाजप मध्ये गेल्यावर नगरसेवक निंबाळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की आजही माझे शिवसेना व यंग चांदा ब्रिगेड सोबत सलोख्याचे संबंध आहे, राजकारण म्हटले की सर्वांशी संबंध ठेवावे लागतात.

महानगरात युवा मोर्चाच्या माध्यमातून युवकांना एकत्र करीत भाजपमध्ये तरुणांना सामील करण्यासाठी पूर्ण ताकद लावून संघटना वाढविणे हा माझा निर्धार आहे.

विशाल निंबाळकर यांच्या महानगर निवडीबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या