Top News

संत गजानन महाराज हायस्कूल पेंढरी (मक्ता) ची विद्यार्थिनी वृषाली यशवंत बोरेवार ८४% गुण घेऊन विद्यालयातून प्रथम.

Bhairav Diwase.    July 30, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
  यात संत गजानन महाराज हायस्कूल पेंढरी (मक्ता) एकुण निकाल ८८.२३%लागलेला आहे या विद्यालयात एकुण ३४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी ३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन संत गजानन महाराज हायस्कूल पेंढरी मक्ता ची विद्यार्थीनी कु. वृषाली यशवंत बोरेवार हि विद्यार्थीनी ८४.%गुण घेवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे तर कु. ज्ञानेश्वरी गणेश मोहुर्ले या विद्यार्थ्यांनीने ७९.%गुण घेऊन विद्यालयातून द्वितीय येण्याचे मान मिळविली आहे. प्रथम श्रेणी मध्ये एकुण २५ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत 
 यांच्या या परिश्रमा बद्दल  पेंढरी मक्ता येथे सर्वत्र  कौतुक होत आहे या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संत गजानन महाराज हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पि. एस. समर्थ, ए. जी. दडमल, एन. एस राखडे, एस. एच. झोडे, ताडुलवार सर, ए. आर. राखडे मॅडम, ए. बी. गेडाम व सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने