Click Here...👇👇👇

संबंधित कंत्राटदाराला काँक्रिटच्या अर्धवट सोडलेल्या रोडचे काम सुरू करण्याचे आदेश देण्याची रिपब्लिकन सेनेची मागणी.

Bhairav Diwase
मा.कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कनिष्ठ अभियंता यांना बोलावून कंत्राटदाराला तात्काळ रोडचे रखडलेले काम सुरू करण्याचे निर्देश.
Bhairav Diwase.    July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- समाज कल्याण चंद्रपूरच्या दलित वस्ती सुधारणेच्या निधी अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अष्टभुजा वार्डातील रमाबाई नगर येथील श्री.गोवर्धन डोंगरे ते श्री.डहाट यांच्या घरापर्यंत काँक्रीट रोडच्या कामाची मंजुरी मिळालेली होती व त्याप्रमाणे कंत्राटदाराने कामाला सुरुवात देखील केलेली होती. परंतु स्थानिक नगरसेवकांने मंजूर असलेल्या रोडचे काम थांबवून तो रोड इतरत्र बांधण्याचा अट्टाहास सुरू केल्याने दोन आठवड्या पर्यंत रोडचे काम रेंगाळत राहिले. अश्यातच स्थानिक नागरिकांनी त्रस्त होऊन रिपब्लिकन सेनेचे इंजि. तथागत पेटकर यांच्याकडे मदतीची मागणी केली. अर्धवट सोडण्यात आलेल्या रोडमुळे त्रस्त झालेल्या लोकांना घेऊन इंजि. तथागत पेटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा.जाधव साहेब यांची भेट घेतली व संबंधित कंत्राटदाराला काँक्रिटच्या अर्धवट सोडलेल्या रोडचे काम सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी करीत, कंत्राटदाराने काम सुरू न केल्यास, कंत्राटदारास काळ्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. लगेच मा.कार्यकारी अभियंता यांनी संबंधित कनिष्ठ अभियंता यांना बोलावून कंत्राटदाराला तात्काळ रोडचे रखडलेले काम सुरू करण्याचे निर्देश दिले. स्थानिक नगरसेवकाने अनावश्यकपणे विरोध केल्या नंतरही, रिपब्लिकन सेनेने रमाबाई नगरातील रोडचे काम सुरू करायला भाग पाडले.
      याकार्यामध्ये रिपब्लिकन सेने सोबतच रमाबाई नगरातील बौद्ध मंडळाचे अध्यक्ष श्री.गोवर्धन डोंगरे, श्री.रमेश उराडे, श्री. ठेंगरे, श्री. प्रणित पेटकर आणि आयु.आशिष उराडे आदी कार्यकर्त्यांच्या सहभाग होता.