माजी सैनिक, विधवांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, शिष्यवृत्तीचे लाभ घेण्याचे आवाहन.

Bhairav Diwase

असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
Bhairav Diwase.    July 24, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-
शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत किमान 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पुढील शिक्षणासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या माजी सैनिकांच्या पाल्यांनी दिनांक 15 ऑक्टोंबर 2020 पर्यंत अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

            लाभार्थ्यांचे अर्ज, शिष्यवृत्ती फॉर्म, ओळखपत्राची छायांकित प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र, उत्तीर्ण झालेल्या वर्गाची गुणपत्रिकेची झेरॉक्स व इतर कुठल्याही योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळत नसल्याचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. ज्या माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती अंतर्गत शिष्यवृत्ती मिळवायची आहे. अशा पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची शिष्यवृत्ती लागू होत नाही. तसेच ज्या पाल्यांनी सीईटी,जेईई किंवा इतर कारणासाठी शिक्षणात खंड घेऊन शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रकरणासोबत गॅप सर्टिफिकेट जोडावे. अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, रूम नंबर 3, चंद्रपूर येथे संपर्क साधावा.