आमदार साहेबांनी लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले.
Bhairav Diwase. July 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा ते सिध्देश्वर तथा सिध्देश्वर ते गडचांदुर मार्गा वर जीव घेणे खड्डे पडलेले असून नागरिकांना रोज या मार्गावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, रात्रीच्या वेळी या मार्गावर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद यांनी राजुरा विधानसभेचे आमदार श्री. सुभाष धोटे जी यांचे कडे या समस्येकडे जातीने लक्ष देऊन खड्डे बुजविण्यात यावे अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. तसेच राजुरा ते लक्कडकोट, राजुरा ते मूर्ती तथा तालुक्यातील विविध मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी चर्चा करण्यात आली.
आमदार साहेबांनी लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर, युवक चे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, शहराध्यक्ष आशिष यमनुरवार, रफिक भाई तथा राहुल धोटे उपस्थित होते.