गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदे यांचेकडे.

Bhairav Diwase
विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेला गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी.
Bhairav Diwase.    July 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर (गडचिरोली जिल्हा):- राज्य शासनाने आज विजय वडेट्टीवार यांच्याकडे असलेला गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबत आज परिपत्रक जारी केले आहे. शासनाच्या ८ जानेवारी २०२० च्या निर्णयान्वये, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्यासह गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले होते. परंतु कोविड-१९ संकटाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल २०२० च्या परिपत्रकान्वये राज्याचे बहुजन कल्याण, भूकंप, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. आजच्या परिपत्रकान्वये वडेट्टीवार यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला असून, आता एकनाथ शिंदे हेच पालकमंत्री राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.