प्रा. आ. केंद्र राजोली येथे रुग्ण कल्याण समितीची सर्वसाधारण सभा संपन्न.

Bhairav Diwase
प्राथमिक आरोग्य केंद्र राजोली येथे आज जि. प. अध्यक्षा तथा केंद्राच्या रुग्ण कल्याण समिती अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक पार पडली.
Bhairav Diwase.    July 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र राजोली येथे आज जि. प. अध्यक्षा तथा केंद्राच्या रुग्ण कल्याण समिती अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक पार पडली.
यामध्ये सभागृहाने सन १९-२०च्या कार्यवृत्ताला मंजुरी देत सन २०-२१ या वित्तीय वर्षाकरिता अनेक खर्चाच्या नियोजनाला मंजुरी दिली. ज्यामध्ये रुग्णकल्याण निधीअंतर्गत १ लक्ष रुपये तर, अबंदिक निधीअंतर्गत २५ हजार तसेच देखभाल निधीअंतर्गत ५० हजार अशा स्वरूपाचे खर्चाचे नियोजन त्यात अंतर्भूत होते. तसेच आरोग्य केंद्राला लागणार्‍या इतर किरकोळ साहित्यांची खरेदी रुग्ण कल्याण समितीच्या सर्व सदस्यांनी स्वेच्छेने उपलब्ध करून देण्याचा निर्णय याप्रसंगी घेतला. 
यावेळी, पं. स. उपसभापती घनश्यामजी जुमनाके, पं. स. सदस्या सौ. जयश्री वलकेवार, सरपंच आनंद पा. ठिकरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. खोब्रागडे, रू.क.स. सदस्य चंदू नामपल्लीवार, मुकेश गेडाम, विजय पाकमोडे, सौ. छायाताई सिडाम, विस्तार अधिकारी जिडगिलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गेडाम, डॉ. गोर्‍हे, आरोग्य सहाय्यक बोरकुटे, वरगंटीवार यांसह आदी मंडळी उपस्थित होते.