भेजगाव येथील शेतात भोवळ येऊन पडल्याने महिलेचा मृत्यू.

Bhairav Diwase
मुल तालुक्यातील भेजगाव येथील घटना.
Bhairav Diwase. July 24, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- मुल तालुक्यातील भेजगाव येथे रोवणीचे काम करीत असताना भोवळ येऊन शेतात पडल्याने शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली अंजली अजय खोब्रागडे ( 28)या अन्य शेतमजुरासह शेतात रोहिणीच्या कामाकरिता गेल्या होत्या मात्र दुपारच्या सुमारास त्यांना भोवळ आली आणि त्या शेतात कोसळल्या यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे