Top News

आमदार मा.बंटी भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यातील सर्व आशा वर्कर यांना मदतीचा हात.

श्री.संतोष रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांचे नेतृत्वाखाली नागभीड तालुक्यातील सर्व आशा वर्कर यांना किराणा किट तसेच सॅनिटायझरच वाटप.
Bhairav Diwase. July 23, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
नागभीड:- संपूर्ण भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या जोमाने सुरू असून कोरोनाचा महामारीचा शिरकाव आता ग्रामीण भागात सुध्दा झालेला आहे. अशातच गेल्या मार्च महिन्यापासून आशा वर्कर यांनी आपल्या जीवाची व स्वतःचे परिवाराची पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटकाळी सुद्धा यांनी अतिशय काळजी पूर्वक लोकांना आरोग्य विषयक सेवा देण्याचे कार्य सुरू केले.

आजच्या परिस्तिथी मध्ये पण त्यांच्यावर शासकीय कामाचाही खूप प्रमाणात भार दिला जातो पण मात्र त्यांचे कामाच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन हा खूपच कमी मिळत असल्याचे निदर्शनास येते.मानधन कमी असले तरी पण आशा वर्कर आपले कर्तव्य पार पाडत कोरोनाशी लढत आरोग्य सेवा जनतेला देत आहेत.आरोग्यसेवा देणारे महत्वाचा घटक तसेच दुवा म्हणून आशा वर्कर यांना संबोधले जाते. लोकांच्या घरोघरी जाऊन प्रत्येक लोकांना,गर्भवती महिलांना,लहान मुलांना आरोग्य विषयक व त्यावरील उपाय हे औषधोपचार च्या माध्यमातून करीत असतात.

याचं सर्व गोष्टींचा विचार करून आशा वर्कर यांचा एक भाऊ म्हणून चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी सूचना करून श्री.संतोष रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड यांचे नेतृत्वाखाली नागभीड तालुक्यातील सर्व आशा वर्कर यांना किराणा किट तसेच सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

आमदार बंटी भांगडीया व भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी आशा वर्कर यांना केलेल्या मदतीकरिता सर्व नागभीड तालुक्यातील आशा वर्कर यांनी मनापासून आभार मानले.
किराणा किट वाटप करतांना श्री.संतोषभाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड जगदीश सेडमाके भाजपा महामंत्री नागभीड, श्री.डॉ.कानझोडे साहेब, सौ.अवतडे म्याडम वैद्यकीय अधिकारी,श्री.माकडे सर,श्री.डोरलीकर सर श्री. संजयजी घोनमोडे,श्री.विनोद आंबोरकर,श्री.अरविंद भाऊ कामडी,सौ.कांचन सिडाम सरपंच मौशी श्री.अमोल देशमुख,श्री.राजू गजपुरे नागभीड तालुक्यातील सर्व आशा वर्कर व भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने