Top News

सावली बांधितांची एकूण संख्या झाली 89.

आज परिचारिकेसह निघाले 28 जण पॉझिटिव्ह.
Bhairav Diwase.    Aug 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील व्याहड बूज या गावातील एका व्यक्ती मुळे सर्वत्र कोरोनाचा प्रसार झाल्याचे दिसत असून मुराड याच परिसरात सर्वात जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने हा परिसर पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे. तर आज पुन्हा कोरोना तपासणी मध्ये सेवेत कार्यरत एका परिचारिकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. परवाला 78 जणांचे तपासणी चे अहवाल बाकी होते त्यातील आज व्याहड बूज येथील 22 तर पाथरी येथील 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले व बाकी निगेटीव्ह आलेले आहे . सावली तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ११ जण कोरोना बाधीत असून त्यातील व्याहड बूज 67 , सामदा , पाथरी 6 , हिरापूर 7 , करगाव । पालेबारसा ।खेडी । चांदली । कवठी । लोंढोली । आहेत यापैकी काही जणांची सुट्टी झालेली आहे . अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मडावी यांनी दिली. सावली तालुक्यात जास्त कोरोनाचा प्रसार हा स्थानिक जिल्ह्यातूनच झाल्याची माहिती पुढे येत असून नागरिकांनी घाबरून न जाता सजग राहावे. सामाजिक अंतर ठेवावे. व मास्क लावावे.तसेच प्रशासनाने दिलेले सूचना चे पालन करीत चलावे असे आव्हान तालुका कोविड टीम ने केले आहे .

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने