भाजप प्रदेश कार्यकरणीत वसंत वारजुकर यांची निमंत्रित सदस्य पदी निवड.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Aug 17, 2020


(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या राज्य कार्यकरणीत वसंत वारजुकर यांची निमंत्रित सदस्य पदी प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकतीच नियुक्ती केली आहे .
       भाजपचे वसंत वारजुकर यांनी भाजप मध्ये प्रवेश करून तत्कालीन विधानसभा निवडणूकित ६० हजार चे वर मते घेतली होती त्यानंतर सुद्धा भाजप मध्ये राहून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या सोबत सतत राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष कार्य करीत आहे . 
         वसंत वारजुकर यांनी नियुक्ती चे श्रेय माजी आमदार मितेशजी भांगडीया व आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना दिले 
असून नियुक्ती बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे