चंद्रपूर जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना.
Bhairav Diwase. Aug 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
चंद्रपूर:- स्वतःचाच पत्नी च्या चरित्रावर संशय घेऊन मारहाण करणे व नंतर तिला जिवंत जाळण्यासाठी अंगावर पेट्रोल टाकल्याचा प्रकार पोलीस स्टेशन सावली अंतर्गत येत असलेल्या किसाननगर या गावामध्ये घडलेला असून आरोपी ला पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की किसान नगर येथील आकाश गरीबचंद मजोके वय 23 वर्ष याने स्वतःची पत्नी ज्योती आकाश मजोके वय 20 वर्ष हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण करायचा.
काल दिनांक 22 ला दुपारच्या सुमारास आरोपी आकाश ने एका बॉटल मध्ये पेट्रोल भरून आणला व सायंकाळी पत्नी ज्योती ला मारहाण करीत तिच्या अंगावर पेट्रोल ओतले व आगपेटी ची काळी आणण्यासाठी स्वप्नांक घरात जाताच महिला आरडाओरड करीत घराबाहेर पडली व ती स्वतःचा माहेरघरी गेली.
घटनेची माहिती स्वतः च्या भावांना देताच त्यांनी आरोपी चे घर गाठून त्याला बेदम मारहाण केली व काच फोडून आकाश ला घाव केले.
या संदर्भात माहिती सावली पोलिसांना देण्यात आली त्यावरून ज्योती च्या तक्रारी वरून अपराध क्रमांक 186/20 कलम 307,323,504 गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपी ला अटक करण्यात आली आहे.
तर मला काचेने मारहाण केली म्हणून आकाश च्या तक्रारी वरून सतीश भागराज मजोके,पिंटू भागराज मजोके,संजय भागराज मजोके सर्व रा.किसननगर यांचावर अपराध क्रमांक 187/20 कलम 324,452,504,506 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी अनुज तारे यांचा मार्गदर्शनात सावली चे ठाणेदार कुमारसिंग राठोड करीत आहे.