सावली तालुका कमिटी मध्ये अध्यक्षपदी श्री. अनिल मडावी तर सचिव पदी श्री. जगदीश वासेकर यांची निवड.

Bhairav Diwase. Aug 23, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम आदमी पक्षाच्या सावली तालुक्या कमेटीची निवड करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व तालुका कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली. मा. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पक्षाची स्थापना केली व संपूर्ण भारतात या पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. याच प्रेरणेतून महाराष्ट्रातील सावली तालुक्यामध्ये सुध्या आप पक्षाची लोकप्रियता वाढीस लागलेली आहे. यामुळे आप पक्ष सम्पूर्ण खेडोपाड्यात नेण्याकरिता गावपातळीवरील कार्यकर्ते यांची निवड सावली तालुका कमिटी मध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये सचिव पदी निवड करण्यात आलेले जगदीश वासेकर हे एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे संपूर्ण सावली तालुका कमिटी मध्ये अध्यक्षपदी श्री. अनिल मडावी तर सचिव पदी श्री. जगदीश वासेकर यांची निवड करण्यात आली. यामुळे झालेली निवड सावली तालुक्यात आप पक्षाची प्रतिमा वाढण्यास नक्कीच मदत होईल. नवीन नवनियुक्त तालुका कमिटीचे हार्दिक अभिनंदन. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी सावली तालुक्यातील नागरिकांनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत