Click Here...👇👇👇

साखरी घाटावरील पुरात अडकली २५० शेळीमेंढी आणि पाच व्यक्ती.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Aug 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यातील साखरी घाटावर पुराच्या पाण्यामुळे २५० शेळीमेंढी व तिन मेंढपाळ तर आपल्या शेतात वास्तव्यास असलेले पती-पत्नी,दोन बैल,दोन गायी व कुत्रा इत्यादी अडकलेले होते. त्यांना काढण्यास प्रशासनाला यश आले आहे.
मागील तिन दिवसापासून गोसेखुर्द पात्रातून सोडलेल्या पाण्याने महाकाय पुराचे रूप धारण केलेले आहे.१९९४ मध्ये आलेल्या पूरानंतर हा पुर असल्याचे सांगितले जात आहे.
    मागील काही दिवसा अगोदर मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील धनगर समाजाचे मेंढपाळ 250 मेंढ्यांचा कळप घेऊन साखरी भागात वास्तव्यास होते.अचानक पाणी वाढल्यामुळे मेंढ़पाळांनी संपर्क साधून आपबीती सावली पंचायत समिती सभापती विजय कोरेवार व धनगर समाजाचे डॉ तुषार मर्लावार यांना सांगितली. त्यांनी वेळेत दखल घेत या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. प्रशासनाने साखरी व सिर्सि येथील ढिवर समाजातील लोकांना भेटून सर्व पुरात फसलेल्या लोकांना व जनावरांना पुरातून काढण्यात यश मिळविले आहे.

या घटनेची माहिती सकाळी ६.३० च्या सुमारास आम्हाला मिळाली.आणि त्यांना काढण्यासाठी प्रशासन सतर्क असून दोन तासात फसलेल्या व्यक्तींना व जनावरांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले आहे.,
-नायब तहसीलदार कांबळे

मेंढपाळ हे बाहेर मेंढ्यांचा कळप घेऊन दिवस रात्र बाहेर असतात . परंतु पुराची माहिती त्यांच्यापर्यंत न पोहचल्याने सकाळी पाण्याने कळप वेळला गेला. याबाबत प्रशासनाला माहिती दिली असता नायब तहसीलदार कांबळे यांनी परिस्थिती हाताळून सुखरूप बाहेर काढल्याने अनुचीत प्रकार घडला नाही.
विजय कोरेवार 
सभापती पं स सावली