Click Here...👇👇👇

चंद्रपुरात अनेक राजकारणी कुटुंब / बडे अधिकारी कोरोना बाधित.

Bhairav Diwase

आमदार किशोर जोरगेवार.

जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती -नागराज गेडाम.
चंद्रपूर महापौरांचे कुटुंब व प्रसिद्ध सामाजिक संस्थेच्या अध्यक्षाचे भाऊ‌.

बडे पोलीस व वैद्यकीय अधिकारी.
Bhairav Diwase. Aug 31, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार कोरोना पॉझिटिव्ह ठरल्यानंतर आज आणखी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती नागराज गेडाम (सिंदेवाही ) व कुटुंबातील 2 सदस्य कोरोना बाधित झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या पत्नी या पोलीस विभागात कार्यरत असून त्यांना आधी बाधा झाल्यानंतर सभापती व इतर एक सदस्य बाधित झाल्याचे कळते.


चंद्रपूर महानगर पालिकेच्या महापौर राखी कंचर्लावार ह्यांच्या कुटुंबातील तीन सदस्यांना सुद्धा कोरोनाची दोन दिवसांपूर्वी बाधा झाली आहे.


चंद्रपुरातील एका मोठ्या पर्यावरण सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष्यांच्या लहान भावाला काल बाधा झाली आहे.


त्याचबरोबर जिल्ह्यातील नावाजलेले मोठे पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकारी देखिल आताच आलेल्या माहितीनुसार कोरोना असल्याचे कळले आहे.


ही सर्व अधिकतर सामान्य नागरिकांच्या गराड्यात वावरणारी मंडळी आहेत. त्यामुळे ह्या कोरोना काळात नागरिकांनी स्वतःच दक्षता बाळगत अनावश्यक गर्दी टाळण्याची गरज आहे.