Bhairav Diwase. Aug 24, 2020
गोंडपिपरी:- कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तीन वर्षा पासून जिल्हा परिषद शाळा व्यंकटपुर येथे कार्यरत असून गोंडपिपरी नगर पंचायत प्रभाग क्र. 7 मध्ये कोरोना साठी सर्वे म्हणुन काम करीत आहे नगर पंचायत शहरा मध्ये सर्वात चांगले कार्य केले आहे म्हणून ज्ञानेश्र्वर यशवंत कातलाम यांचा गणेश स्थापनेच्या शुभ मुहूर्तावर संगमवार यांच्या घरी भाजपा तालुकाध्यक्ष यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात टाकून जनतेचे आरोग्य सुखरूप राव त्यामुळे घराघरात जाऊन जनतेच्या आरोग्य बद्दल माहिती घेऊन प्रशासना पर्यंत माहिती पोहचवण्याचा कार्य उत्तम पने करत होते त्यामुळे जनते मध्ये त्यांच्या कामाचं कौतुक गोंडपिपरी शहरात होऊ लागला त्या पार्श्वभूमीत भाजपा गोंडपिपरी तर्फे कोविड 19 योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला
याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बबन नीकोडे, भाजपा जेष्ठ नेते निलेश संगमवार, नगर पंचायत सभापती चेतन सिंह गौर, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव राकेश पुन, सुनील फुकट, तिरुपती झाडे इ. कार्यकर्ते उपस्थित होते.