कारगाव येथे उघड्यावर पडलेले योगा व्यायम साहित्य.
Bhairav Diwase. Aug 04, 2020
कोरपना:- जिवती तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या ग्राम पंचायत धनकदेवी अतर्गत १००% आदिवासी लोकवस्ती असलेल्या कारगाव (खु) मरकागोंदी हे गाव असुन गेल्या ५ वर्षापासुन १४ वित्तीय आयोग व पेसा अतर्गत मोठ्या प्रमाणात निधि उपलब्ध झाला मात्र तो निधि ग्रामसेवक व पदाधिकारी यांनी गौरव्यवहार अफरातफर करुण दोन्ही गावाला विकास कामे केली नाही पेसा अतर्गत कारगाव (खु) व मरकागोंदी येथे ग्राम पेसा कोष समीती चे स्वतंत्र खाते उघडले नाही धनक देवी समीतीत निधि जमा करूण ग्रामकोष निधिचा डल्ला मार ल्या जात आहे पुर्नवसन योजनेच्या २५ वर्षा पुर्वी च्या नाल्या रस्ते ना दुरुस्त झाले पावसाचे पाणी घरात घुसून नागरीका चे नुकसान होत आहे.
ग्राम पंचायतीने पंचवार्षिक आराखडा कामाचे नियोजन केले मात्र पेसा नियमाची पायमली करूण नियोजना नुसार एकही काम गावात झालेले नाही शौचालय घर कुल अर्धवट पडलेअसल्याने अनेक आदीवासी कुंटूबाचे हाल होत गावात जंगल प्राण्याची भिती आहे विद्युत व्यवस्था बरोबर नाही पिण्याचे पाणी नळ योजना बंद आहे ग्राम पंचायत कारभाराची चौकशी करा ग्राम कोष स्वतंत्र खाते उधडण्यात यावे या करीता जनसत्याग्रह संघटना कारगाव शाखे नी एल्गार पुकारला असुन सवर्ग विकास अधिकारी जिवती यांना तकार देऊन चौकशी ची मागणी केली आहे.