Top News

सावलीचे सिंचन विभाग कार्यालयाचे स्थानांतरण रद्द करा सावलीकरांची मागणी

सावली भाजपतर्फे खासदार अशोक नेते यांना निवेदन.
Bhairav Diwase. Aug 04, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सुमारे शंभर वर्षांपासून अस्तित्वात असलेले इंग्रज कालीन सावलीचे सिंचाई विभागाचे कार्यालय सावली येथून गोंडपिपरी येथे स्थलांतरीत होणार असल्याने स्थानांतरण रद्द करा अशी मागणी क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
असोला मेंढा तलावाचे शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे वाटप करण्यात अग्रेसर असलेले सिंचाई विभागाचे कार्यालय सावली येथून गोंडपिपरी येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. ऐन शेतीच्या हंगामाच्या कालावधीत सदर कार्यालय इतरत्र हलविण्यात येणार असल्याने शेतीसाठी पाणी वाटपाची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. सिंचाई कार्यालय बंद करून सावली तालुक्यावर अन्याय झालेला असून  शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी सिंचाई विभागाचे कार्यालय सावली मध्ये असावे अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी  भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतिश बोम्मावार, माजी बांधकाम सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष तंगडपल्लीवार, जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश खजांची शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, पुनमभाऊ झाडे, अतुल लेनगुरे, राकेश विरमलवार, विशाल करंडे तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने