अंतरगाव रुग्ण कल्याण समितीच्या अध्यक्षानी केली स्वतःच्या नावे रक्कमेची उचल.

Bhairav Diwase
चौकशी करून कार्यवाही करण्याची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांची मागणी.
Bhairav Diwase.    Aug 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- सावली तालुक्यात सर्वात मोठे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरंगाव येथील रुग्ण कल्याण समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्या वैशाली सुरेश शेरकी यांनी रुग्ण कल्याण समितीच्या खात्यातून स्वतःच्या नावे को. ऑप. बँक अंतरंगाव येथून 32000/-रुपये उचल केल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीतुन उघड झाले असून त्यांची तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी केलेल्या तक्रारीतुन केली आहे. 
स्थानिक जिल्हा परिषद सदस्य हे रुग्ण कल्याण समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात परंतु त्या अध्यक्षाना समितीची कोणतीही रक्कम स्वतःचे नावे उचल करता येत नाही, परंतु येथील कांग्रेसच्या जि. प. सदस्या वैशाली सुरेश शेरकी यांनी पदाचा गैरवापर करून पती शाखाधिकारी असलेल्या को. ऑप. बँक अंतरंगाव शाखेतून 32000/- रुपये दि. 21 मार्च 2020 ला उचल केलेली आहे.
जिल्हा परिषद सदस्य तथा रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष यांना समितीचा निधी परस्पर उचल करता येत नाही, तशी तरतूद कोणत्याही अधिनियमात नाही, त्यामुळे सदर जिल्हा परिषद सदस्यांनी पदाचा दुरुपयोग केलेला आहे असे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीद्वारे  जिप /पस अधिनियम अंतर्गत दोषी होत आहेत,  जि.प. अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी या प्रकरणाची  तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष पुनम झाडे यांनी केली आहे.