Bhairav Diwase. Aug 05, 2020
सावली:- मानवाच्या अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर त्यासमोर अशक्य असे काहीच नाही असेच काहीसे प्रकार सावली तालुक्यातील उसेगाव तसेच कवठी येथे घडले आहे.
तालुक्यापासून 7 किमी. अंतरावर असलेले उसेगाव तसेच 9 किमी अंतरावर असलेले कवठी येथील विद्यार्थिनींनी भारत शिक्षण प्रसार मंडळ अंतर्गत विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालय सावली येथून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे अंतर्गत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी - मार्च 2020 च्या परीक्षेत तालुक्यातून अनुक्रमे कु. तृप्ती मुसद्दीवार रा. उसेगाव हिने 86.30 % टक्के गुण घेत पहिला क्रमांक तर कु. यशोधरा प्रकाश घोटेकार रा. कवठी हिने 84.24 % टक्के गुण घेत दुसरा क्रमांक पटकावून तालुक्यात यावेळी मुलींनी बाजी मारली आहे.
घरकाम,शेतीचे काम करून कठीण समजल्या जाणाऱ्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला 7 ते 9 किमी. सायकलने प्रवास करत आपल्या अंगी असलेल्या जिद्द आणि चिकाटीने अतिशय सामान्य कुटुंबातील या दोन्ही विद्यार्थिनींनी फक्त श्रीमंतांची मुले हुशार नसून सामान्य कुटुंबातील मुली सुद्धा त्यापेक्षा हुशार असतात हे दाखवत तालुक्याचा नाव उंचावला आहे . याचेच अवचित्य साधत प्रहार संघटना सावलीचे प्रहार सेवक श्री.राकेश गोलेपल्लीवार,प्रफुल तुम्मे पाथरी, मिथुन मेश्राम , प्रकाश घोटेकार , राकेश घोटेकर कवठी , देवा बावणे , उमेश वरगंटीवार, धनराज कोहळे आदिंच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थिनींचे राहते घर गाठत उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.